क्रोएशियाची बलाढ्य ब्राझीलला हरवून उपांत्यफेरीत धडक

Google search engine
Google search engine

कतार : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य-पूर्व सामन्यात क्रोएशियाने जगातील नंबर वन टीम व पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलला १-१ (४-२ ) असे हरवून स्पर्धेबाहेर केले. क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये हा विजय मिळवला.कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलला पराभवाचा धक्का बसला आहे. जगातील नंबर वन टीम ब्राझीलला क्रोएशियाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केले.

क्रोएशिया सलग दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, ब्राझीलचा संघ सलग दुसऱ्या वेळी क्वार्टर फायनलमधून बाहेर पडला आहे. या सामन्यात ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारने गोल केला मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अतिरिक्त वेळेत खेळ संपण्यापर्यंत स्कोर १-१ असा बरोबरीत होता. त्यानंतर क्रोएशियाने पेनल्टीमध्ये ४-२ ने विजय मिळवला.