सावर्डे :
सह्याद्री शिक्षण संस्थेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावर्डे आय.टी.आय येथे फिटर, ड्रॉफ्टसमन सिव्हील, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटार व्हेईकल, रेफ्रिजेशन अँड एअर कंडिशनर व मेकॅनिक ड्रॉफ्टसमन या दोन वर्षीय कालावधीच्या सहा ट्रेडला तर कोपा, वेल्डर, मेकॅनिक डिझेल व स्युईंग टेक्नॉलॉजी या एक वर्षीय कालावधीच्या चार ट्रेडला असे एकूण दहा ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची सुरुवात दि. 12 जून 2023 पासून झाली असून अर्ज करण्याची मुदत दि. 11 जुलै 2023 पर्यंत आहे.
औद्योगिक क्षेत्राला गरज असणारे प्रशिक्षित व कौशल्य संपन्न मनुष्यबळ दिवसेंदिवस अपुरे पडत आहे. हे पाहता 10 वी / 12 वीचे शिक्षण झाल्यावर कौशल्य आधारित असणारे आय.टी.आय चे एक व दोन वर्षाच्या कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भरपूर प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे 10 वी / 12 वी झाल्यावर लगेचच एक / दोन वर्षात आपले उत्पन्न सुरू होते.
त्याच बरोबरीने आय.टी.आय झाल्यावर डिप्लोमा इंजिनिअरींग ला दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. त्यामुळे डिप्लोमा होऊन पुढे डिग्री इंजिनिअरींग सुद्धा आपण करू शकतो.
तसेच आय.टी.आय उत्तीर्ण झाल्यावर बारावी बोर्डाचे दोन विषयांची परीक्षा दिल्यावर 12 वी समकक्षता प्रमाणपत्र प्राप्त होते त्यामुळे पुढे पदवीचे पण शिक्षण घेऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थ्यांनी आय.टी.आय ला प्रवेश घेऊन आपले उज्वल करिअर घडविणे करिता 10 वी / 12 वी विद्यार्थ्यांनी आय.टी.आय सावर्डेला भेट देऊन,माहिती घेऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने https//admissiondvet.gov.in या संकेत स्थळावर जाऊन सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये वरील ट्रेड करिता प्रवेश घेण्याचे आव्हान प्राचार्य उमेश लकेश्री यांनी केले आहे.
प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा ॲडमिशन बाबत मार्गदर्शन सुविधा,अर्ज निश्चिती करणे व विकल्प भरणे या सुविधा सह्याद्री आय.टी.आय मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. जेणे करून विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोयीचे होईल. तरी अधिक माहितीसाठी संस्थेत संपर्क करावा.
संपर्क नंबर – संतोष कदम-9422883233, सुरज शिंदे-9527851827 स्वप्नील बांबाडे- 9405071361, यांच्याकडे संपर्क करावा.