रत्नागिरी | प्रतिनिधी :
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रिया धारकांनी २०१८ मध्ये काजू दर १८० रू. दराने खरेदी केला. परंतु परदेशातून आयात केलेल्या काजुचा दर ११० रू. होता. यामुळे कारखानदारांचे फार मोठे नुकसान झाले. परिणामी घेतलेले कर्ज परतावा करता येत नसल्याने काही प्रकरणे N. P.A. झाली आहेत. त्यामुळे या सर्व कारखानदारांची कर्जे १० वर्षांकरिता पूनर्गठीत करून मिळाल्यास सर्वांना हप्ते भरणे सोयीचे होईल व कर्जाची परतफेड ही होईल. अशा मागणीचे पत्र मा. प्रमोद जठार ,सतेज नलावडे,काजू प्रक्रिया धारक संघाचे विवेक बारगिर,संदेश पेडणेकर,तौफ़ीक़ खतिब यांनी मा. डॉ. भागवत कराड साहेब, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भारत सरकार याना दापोली येथे मंत्र्यांचा दौरा असताना भेट घेऊन दिले यावेळी बैंक ऑफ़ इंडिया चे झोनल मैनेजर श्री.सावंत व LDM श्री.खांडेकर उपस्थित होते.