रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी यांच्या वतीने ‘श्रावणधारा’ या स्वरचित काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आधुनिक कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांच्या या भूमीतून अनेक साहित्यिक उदयास आले . त्यांनी आपल्या साहित्यामधून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. त्यांची काव्य परंपरा कायम जपण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद दरवर्षी ‘श्रावणधारा’ हा स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करून रत्नागिरी तालुक्यातील ज्येष्ठ व नवोदित कविना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते व साहित्य चळवळ अखंड चालू ठेवण्याचे काम करत आहे.
साहित्य परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले असून त्यासाठी पाऊस व श्रावण हे दोन विषय देण्यात आले आहेत. कवीने या दोन पैकी कोणत्याही एका विषयावर स्वरचित कविता सादर करायचे आहे. सहभागी कवींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. हे काव्य वाचन, युवा गट आणि खुला गट अशा दोन गटात होणार असून ३५ वर्षांपुढील खुला गट असेल.
हा कार्यक्रम रत्नागिरी तालुका मर्यादित असून सहभागी होणार्या कवीनीं आपली कविता , परिचय, गट, व मोबाईल क्रमांकासहित पुढील व्हाट्सअप क्रमांकावर दि.३० जुलै पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले आहे.
सहभागी होणार्या कवीने आपल्या कविता श्री. दुर्गेश आखाडे ९४२२६३६९५०, आकांशा भुर्के ९४२२४३२६६५, तेजा मुळ्ये ८६६८७४१०८२, चंद्रमोहन देसाई ९७६४७९६६७६, श्री.आनंद शेलार ९१३०७६७१२२, यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.