आरोपीला स्वतःचा बचाव करण्याचा हक्क आहे म्हणून…

लोक अभिरक्षक कार्यालयातील बचाव विधी सहाय्यकांनी केली उत्तम कामगिरी

रत्नागिरी | प्रतिनिधी : आरोपीला स्वतःचा बचाव करण्याचा हक्क असून त्यासाठी त्याला दर्जेदार विधीसेवा मिळण्याचा हक्क असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने लोकअभिरक्षक कार्यालय स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी मधे देखील जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.

या कार्यालयामार्फत मुख्य न्यायदंडधिकारी, प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी यांचेकडील रिमांड ची कामे लोक अभिरक्षक कार्यालया मार्फत नेमलेले बचाव सहाय्यक सल्लागार पाहतात. ( Assistant LADCS)
भा. द. वि. कलम ३७९ या कलमाअंतर्गत रत्ना. ग्रामीण पोलिसांनी 18 वर्षाच्या मुलाला मिरज येथे अटक केली. लोक अभिरक्षक कार्यालयाकडून आरोपीच्या वतीने ॲड. आयुधा अक्षय देसाई यांनी भक्कमपणे बाजू मांडली ॲड. देसाई यांनी आरोपीचा बचाव करण्याचा टोकाचा प्रयत्न केला व आरोपीस जामीन मिळवून दिला. त्यांच्या या प्रयत्नाची दखल घेतली गेली आहे. या व अश्या प्रकरणामध्ये ॲड. यतीन धुरत व ॲड. पल्लवी धोत्रे यांनी सहकार्य करतात.

काय आहे लोकाभिरक्षक कार्यालय

आरोपीला देखील स्वतःचा बचाव करण्यासाठी अधिकार आहे. त्यासाठी योग्य कायदेशीर सेवा मिळण्याचा हक्क आहे. ही भूमिका न्यायव्यवस्थेने जोपासली आहे. ज्या आरोपींना स्वतःचा बचाव करण्यासाठी खासगी वकिल नेमणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी विधी सेवेकडून मोफत विधी सेवा पुरवली जात होती . परंतु आता त्या साठी स्वतंत्रपणे लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य विधी सहाय्यक म्हणून ॲड. अजित वायकुळ काम पाहतात .