चिपळूण ( वार्ताहर ) : भाई कुळे युवा मंचातर्फे तालुक्यातील नारदखेरकी मराठी शाळा नंबर १ येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या गावचे सुपुत्र शाहीर अनिल जाधव यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.
सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन काम करणारे पत्रकार संतोष (भाई) कुळे हे गरजूंना मदतीचा हात देत असतात.
ते शक्य होतील तेवढी लोकांची वैयक्तिक कामे करून देण्यासाठी सुद्धा अग्रेसर असतात. शाहीर अनिल जाधव यांच्या प्रयत्नातून नारदखेरकी शाळा नंबर १ येथील पाहिले ते चौथी मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून एक शैक्षणिक पद्धतीचा हात देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र गोरे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ गोखले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी अनिल जाधव यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच सौ तनुजा साळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ गोखळे, सौ सोमण आणि इतर पालक वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक रवींद्र गोरे यांनी आभार व्यक्त केले.