चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा माहेश्वर मंडळाच्यावतीने दि. २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील माहेश्वर भवन येथे तीन दिवसीय कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २७ रोजी महोत्सवाची सुरूवात दुपारी ३ वाजता ‘रुद्राभिषेकाने’ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ७ वाजता भव्य कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडेल. दि. २८ रोजी सायंकाळी ४ वाजतामहिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ रोजी महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ‘विविध गुणदर्शन सांस्कृतिक’ कार्यक्रम सादर केले जातील. रात्री ९.३० वाजता कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस समारंभ पार पडेल.
महोत्सवास समाजबंधुंनी आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माहेश्वर मंडळाचे जिल्हाध्यक्ष कृष्णकांत जंगम, सचिव प्रशांत जंगम, खजिनदार अविनाश जंगम तसेच कार्यकारिणी मंडळ व समस्त जंगम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.













