रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील सोमेश्वर येथे काही वर्षांपूर्वी राजकीय संघर्षातून रविंद्र पांडुरंग मयेकर या तरुणाचा खून करण्यात आला होता.या वादातून रविवारी सायंकाळी आणि सोमवारी दुपारी दोन गटात तुफान राडा झाला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली असून रुपेश मयेकर,विरेंद्र शिंदे आणि संदिप कदम या तिघांना अटक करण्यात आली आहे.
अक्षय मयेकर,प्रथमेश बिडू,सुरज मयेकर,निलेश मयेकर,आशिष मयेकर, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एकूण आठ संशयितांची नावे आहेत.याबाबत मृत रविंद्र मयेकरचा पुतण्या सुरज मयेकरने दिलेल्या तक्रारीनुसार,रविवारी सायंकाळी 7 वा.सुमारास सुरज हा गावातील ग्रामपंचायती समोर असलेल्या पानपटटीजवळ उभा होता.तेव्हा रुपेश मयेकरने त्याला काकाच्या खुनाच्या आरोपात आपल्याला झालेल्या शिक्षेचा राग मनात धरुन आपल्या सोबत असलेल्या विरेंद्र शिंदे आणि संदीप कदम यांच्या मदतीने सुरजला बेदम मारहाण केली.याप्रकरणी त्याने गा्रमीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन या तिघांविरोधात भादंवि कायदा कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर परस्पर विरोधी तक्रार दीपक उर्फ बाब्या मयेकर याने दिलेल्या तक्रारी नुसार,सोमवारी दुपारी 11 वा.ते आपल्या दुचाकीवरुन जात असताना सोमेश्वर ग्रामपंचायतीसमोर प्रथमेश बिडू हातात रॉड घेउन त्याच्या समोर आला.त्याला पाहून दिपकने आपली दुचाकी थांबली असता अक्षय,सुरज,निलेश आणि आशिष सर्वांनी मिळून लोखंडी हत्यार, रॉड आणि दांडक्याने दिपक मयेकरला जबर मारहाण केली.याप्रकरणी त्याने तक्रार दिल्यानंतर संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 307,120 (ब),143,147,148,149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.