फोंडाघाट महाविद्यालयात “हिंदी मेरी शान” भित्तिपत्रिकेचे उद्घाटन !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — फोंडाघाट एज्युकेश सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे हिंदी विभागाच्या वतीने “हिंदी पंधरवाड्या” निमित्त “हिंदी मेरी शान” या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.प्राचार्य डॉ. नारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भित्तिपत्रिका लेखनाचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “भित्तिपत्रिकांच्या माध्यमातूनच उद्याचे कवी, लेखक व विचारवंत घडतात. समाजाला व देशाला दिशा देणारे लेखक या मंचातून निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील साहित्य मनापासून वाचावे तसेच स्वतः लेखनाचा प्रयत्न करून आपल्या कल्पना समाजापर्यंत पोहोचवाव्यात.”

 

 

 

हिंदी विभाग प्रमुख डॉ. संतोष रायबोले यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या साहित्याचे कौतुक करताना हिंदी भाषेचे राष्ट्रीय एकात्मतेतील स्थान अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक तसेच विविध विभागांचे प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….