जागर आदिशक्तीचा .. समर्थ नगर, भिंगळोली येथे नवरात्र उत्सवासानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल.

मंडणगड : प्रतिनिधी, 
– मंडणगड शहरानजीक असलेल्या भिंगळोली समर्थनगर येथे समर्थ नगर शारदीय नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने देवी दुर्गामातेच्या मूर्तीची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यामिनित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद सुतार यांनी दिली. मंडळाने आयोजित केलेल्या दांडियारास, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची अश्या कार्यक्रमांना मोठी गर्दी पाहायला मिळते.
मागील 18 वर्षांपासून समर्थ नगर शारदीय नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्सहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. देवीची प्रतिष्ठापना मंडळातर्फे मोठ्या भक्तिभावाने करण्यात येते. नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांतून सामाजिक, व सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वाचे योगदान समर्थ नगर येथील नागरिकांनी या उत्सवाच्या माध्यमातून दिले आहे.
उत्सव यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद सुतार, माजी पंचायत समिती सदस्य आदेश केणे, युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य चेतन सातोपे, उद्योजक सीताराम खेडेकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेश नगरकर, शिक्षक श्री. दिवेकर, अप्पा मोरे, उद्योजक संदीप इंगावले, प्रणव गुहागरकर, सुरेश दयाळकर, किरण पवार, दीपक गुहागरकर, केतन सातोपे, योगेश खेडेकर, भरत सरफरे, श्री. भुवड, तंटामुक्त अध्यक्ष निलेश जाधव, निवृत्त शिक्षक सुनील घोसाळकर, दयानंद राठोड आदि मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.