अक्षय तावडे यांची युवासेना सिंधुदुर्ग उपसचिव पदी नियुक्ती!

मसुरे | झुंजार पेडणेकर :महान गावचे सरपंच श्री. अक्षय अजय तावडे यांची शिवसेना पक्षाच्या” युवासेना सिंधुदुर्ग उपसचिव (मालवण, कुडाळ) पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते व शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक बाईत, अभि लाड,

राहुल बागवे, प्रसाद जाधव,प्रीतम गावडे, शाम वाककर, धनंजय परब, मंगेश साळस्कर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे तसेच युवासेना कार्याध्यक्ष श्री पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार आपली शिवसेना पक्षाच्या” युवासेना सिंधुदुर्ग उपसचिव (मालवण, कुडाळ) पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.असा या नियुक्ती पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. नियुक्ती बद्दल अक्षय तावडे यांचे अभिनंदन होतं आहे.