महसूल विभागाने जप्त केलेला ट्रक चोरून नेणाऱ्या मालकाला देवरूख पोलीसांनी ठोकल्या बेड्या

देवरूख पोलीसांच्या कामगिरीचे होतेय कौतुक*

*निलेश जाधव / देवरूख*

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेला तब्बल १९ लाख रुपयांचा ट्रक चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ट्रक चोरून नेणाऱ्या ट्रकमालकाला देवरूख पोलीसांनी मंगळवारी रात्री साखरपा येथून अटक केली आहे. शरणबसप्पा धरमण्णा तळवार (रा. कलंहागरगा, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपीत याने त्याचे मालकीचा ट्रक नं. KA-32 D-6134 हा दि. १६/०९/२०२५ रोजी १३.०० वा. लांजा ते दाभोळे रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा सुकमवाडी चे समोरील रस्त्यावर ट्रकमध्ये ओव्हरलोड जांभा दगडाने भरलेल्या स्थितीत उभा मिळून आल्याने महसूल विभागामार्फत सदर आरोपी याचेवर कारवाई करुन अधिक कारवाई करीता आरोपीत याचे ताब्यातील वाहन व वरील वर्णनाचा जांभा दगड तहसिलदार कार्यालय देवरुख येथे जमा करणेकारीता दि. १७/०९/२०२५ रोजी सकाळी ०७.३० वा. शिवाजी चौक येथे वडाचे पाराजवळ रस्त्याचे बाजुला उभा करुन ठेवण्यात आलेला होता.

वरील तारखेस वेळी व ठिकणाहुन आरोपीत याने आपल्या मालकीचा वरील ट्रक व त्यामध्ये असलेला जाभां दगड हा तहसिलदार कार्यालय देवरुख यांचे येथे कारवाई करणेकरीता ताब्यात असलेला अनधिकृतरित्या वाहन चालु करुन कोणाच्याही परवानगी शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला होता. दरम्यान, मोबाईल लोकेशनद्वारे या आरोपीचा शोध घेवून देवरूख पोलीसांनी मुद्देमालासहित या आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो. हे. काँ. आर्या वेलवणकर, पो. हे. काँ. सचिन कामेरकर, पो. हे. काॅ. सचिन पवार, पो. हे. काॅ. अभिषेक वेलवणकर, चालक पो. काॅ. पाटील यांनी केली आहे. देवरूख पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.