जामसंडेतील ज्येष्ठ व्यापारी मारुती धोंडू वालकर यांचे निधन

जामसंडे (ता. देवगड) : जामसंडे येथील बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी कै. मारुती धोंडू वालकर (आप्पा वालकर) वय ७६ यांचे आज पहाटे उपचाराअंती निवासस्थानी निधन झाले.

 

व्यवसाय क्षेत्रात “वालकर बंधू” या नावाने त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे त्यांनी एक मोठा ग्राहकवर्ग जोडला होता. त्यांच्या निधनाने जामसंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

त्यांच्या पश्चात पत्नी व पुतणे असा परिवार आहे.

 

त्यांचा अंत्यसंस्कार आज सकाळी १०.३० वाजता पार पडला.