या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयजी कदम उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्षा श्रीमती कृपाताई घाग, तालुकाप्रमुख उन्मेषजी राजे, विधानसभा क्षेत्रसंघटक प्रदीपजी सुर्वे, शिवसेना नेते प्रकाशजी कालेकर, महिला पदाधिकारी श्रीमती चारुताई कामतेकर व श्रीमती दीप्तीताई निखारगे, तसेच युवा तालुकाप्रमुख अमितजी पारदुले आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये चिरेखाण व्यावसायिक पांडुरंगजी बांद्रे, आसूद ग्रुप ग्रामपंचायत सरपंच कल्पेशजी कडू, सुभाषजी बेनेरे, अविनाशजी चव्हाण यांच्यासह इतर ग्रामस्थांचा समावेश आहे. या सोहळ्यावेळी झालेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी व स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली ऐक्य व विकासाचा संकल्प व्यक्त केला.










