बांदा : प्रतिनिधी
डोंगरपाल येथील गुणाजी गोपाळ गवस (वय ६८) यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आज सकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याच्यावर हाॅस्पिटल मध्ये उपचार करून घरी आणण्यात आले होते.
गुणाजी गवस हे डोंगरपाल हायस्कूलचे विद्यमान खजिनदार म्हणून कार्यरत होते. माऊली मंदिर डोंगरपाल देवस्थान कमिटीचे ते सदस्य होते. डोंगरपाल गावच्या माऊली युवक मंडळाचे संस्थापक सचिव होते. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग होता. सामाजिक कार्यातही ते नेहमी सक्रीय असत. कबड्डी व हॉलीबॉल या खेळातही त्यांचा एकेकाळी हातखंडा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.








