
मडूरा परब मित्र परिवाराचे आयोजन
बांदा : प्रतिनिधी
मडूरा येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत दिव्या गुरुनाथ परब तर फुगडी स्पर्धेत सातेरी नेमळे संघाने प्रथम क्रमांक मिळविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मडूरा येथील परब मित्र परिवाराच्या वतीने खुली रांगोळी व फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : (रांगोळी स्पर्धा) – प्रथम दिव्या गुरुनाथ परब, द्वितीय सौ. दिक्षा यशवंत पंडीत, तृतीय मनाली शेटये, उत्तेजनार्थ रुषाली रवींद्र केरकर. (फुगडी स्पर्धा) – प्रथम सातेरी फुगडी संघ नेमळे, द्वितीय शायनिंग स्टार सातोसे, उकृष्ट वेशभूषा दिव्या दत्ताराम परब,
सर्वोत्तम स्टॅमिना सौ. तन्वी घन:शाम परब, उत्कृष्ट सादरीकरण सौ. श्रीमती प्रकाश परब.
स्पर्धेचे नियोजन प्रवीण परब, भूषण परब, केशव परब, सखाराम परब, संतोष परब, सिद्धेश परब, रुपेश परब, प्रशांत परब यांनी केले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण मडुरा हायस्कूलचे कलाशिक्षक श्री. कुरणे यांनी केले. फुगडी स्पर्धेचे परीक्षण शेखर सापळे व सौ. वीणा बर्डे – कुंडईकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलीस पाटील नितीन नाईक यांनी केले.
———













