सरमळे नांगरतास येथे बिबटया थेट अंगणात.

ओटवणे (प्रतिनिधी ) सरमळे नांगरतास येथे शनिवारी मध्यरात्री बिबटा भक्षाच्या शोधात थेट अंगणात आला. सरमळे नांगरतासवाडीतील सखाराम माधव यांच्या घराच्या अंगणात हा बिबटा आला होता. भर वस्तीत असणाऱ्या या घराच्या अंगणात असणाऱ्या सी सी टीव्ही मध्ये या बिबट्याच्या मुक्त संचार कैद झाला अंगणात असणाऱ्या दोन कुत्र्यांची शिकार करण्यासाठी दबक्या पावलांनी येणारा बिबटा पाहताच दोन्ही कुत्र्यांनी जोर जोरात ओरडायला सुरुवात केली हा आवाज ऐकून सखाराम माधव हे बाहेर आले यावेळी कुत्रे तेथून पसार झाले मात्र बिबटा दबा धरून बसला होता दरवाजा उघडताच बिबट्याने तेथून धूम ठोकली. समोर अचानक बिबट्याला पाहताच माधव हेही घाबरून गेले.

सरमळे नांगरतासवाडी हा भाग जंगलमय असल्यामुळे जंगली जनावरांचा वावर असतोच मात्र आता थेट बिबट्या सारखे हिंसक प्राणी भक्षाच्या शोधात थेट मानवी वस्तीत घुसत असल्याने या परिसरात भीतिचे वातावरण पसरले आहे या बिबट्याच्या मुक्त संचारमुळे ग्रामस्थमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हे प्राणी माणसांवरही हल्ला करण्याची दाट शक्यता असून यावर वन खात्याने योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.