आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरामध्ये शारदोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सांगतेच्या दिवशी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, शाळा प्रबंधक विनायक हातखंबकर, माजी मुख्याध्यापिका शीतल काळे, सुनिता कुलकर्णी, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम व सर्व शिक्षक, शिक्षक-पालक संघाचे प्रतिनिधी व पालक उपस्थित होते.

या कार्यक्रमात शाळेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शाळेतील योगशिक्षिका स्वाती मलुष्टे, शिक्षिका प्रीती देवरूखकर, तिर्था कोकजे आणि संगणक शिक्षिका मनस्वी तांदळे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. त्यांनाही गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना शिक्षिकांनी शाळा व संस्थेचे आभार मानले. पालकांसाठी आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. माजी मुख्याध्यापिका सौ. काळे यांनी नवीन वास्तू आणि विद्यार्थ्यांची प्रगती, विविध कार्यक्रम परंपरेनुसार सुरू असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शाळेची प्रगती, विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे मूल्यशिक्षण याबाबत सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

स्पर्धानिहाय विजेत्या विद्यार्थ्यांची नावे
इयत्ता चौथी- नाट्यछटा स्पर्धा- प्रथम ओवी गाठे (राणाप्रताप), द्वितीय शांभवी सनगरे (छत्रपती शिवाजी), तृतीय विभागून – स्वरा मोंडकर, ओवी राऊत (राणी लक्ष्मीबाई), उत्तेजनार्थ- रिया काजरेकर (छत्रपती शिवाजी), श्रीपाद भिडे (राणाप्रताप). इयत्ता दुसरी नाट्यछटा स्पर्धा- प्रथम मयुरेश पाटील (मुक्ताई), द्वितीय रुद्राणी मुळ्ये (ज्ञानेश), तृतीय विभागून- अनुष्का नानिवडेकर (ज्ञानेश), हर्ष हातखंबकर (मुक्ताई), उत्तेजनार्थ- रुही पनोरकर, दुर्वा पवार (निशिगंध). इयत्ता तिसरी- नाट्यछटा स्पर्धा प्रथम- सार्थक ढवळ (ध्रुव), द्वितीय- गंधर्व पाध्ये (एकलव्य), तृतीय दुर्वा बंडबे (प्रल्हाद), उत्तेजनार्थ- धृती फाटक (एकलव्य), उत्तेजनार्थ- स्वरूप नेवरेकर (ध्रुव), विशेष वेशभूषा- जिजामाता तिर्था जाधव (एकलव्य).