जिल्हा वेतन अधीक्षिका किशोरी करमुसे यांना निवेदन
गौरव पोंक्षे | माखजन :
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयाना १ ऑगस्ट पासून वाढीव २०% टक्के अनुदान देण्याचा निर्णय शासनानाने घेतला आहे.शिक्षण उपसंचालकांनी राज्यातील जी अंशतः उच्च माध्यमिक विद्यालये वाढीव २०% अनुदासनास पात्र ठरतात अशांच्या याद्या जाहीर केल्या आहेत.तसेच विविध जिल्ह्यात ज्या अंशतः अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा टप्पा वाढी साठी पात्र ठरत आहेत,अशा संबंधित शाळांना त्या त्या जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी पत्र दिली आहेत.
राज्यातील काही विभाग वगळता हे काम जलद गतीने झाले.वास्तविक पाहता सप्टेंबर चा पगार हा वाढीव २०% नी होणे अपेक्षित होते.परंतु वाढीव २०% साठी लागणारा निधी हा मंत्रालयातून ,शिक्षण आयुक्त,शिक्षण संचालक अशा कार्यालयाना वर्ग न झाल्याने,जिल्ह्यातील वेतन अधीक्षकांपर्यंत पोहचू शकला नाही.
परंतु सध्या शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी पगार जमा करण्यासाठी शासनाच्या हालचालीना वेग आलेला दिसून येत आहे.किंबहुना विविध संघटनांकडून तशी मागणी ही होत आहे.याचं पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०२५ चा पगार हा वाढीव २०% ने व्हावा यासाठी रत्नागिरी जिल्हा अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती संघटने तर्फे जिल्हा वेतन अधीक्षिका किशोरी करमुसे यांना यांना निवेदन देण्यात आले.
ऑक्टोबर चा पगार वाढीव २०% ने करण्या साठी व ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा फरक अदा करण्यासाठी लागणाऱ्या निधी ची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करावी. अशी मागणी करण्यात आली.शिवाय १५ ऑक्टोबर पर्यंत बिले फॉरवर्ड करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाना अवधी द्यावा.व या मुदतीत वाढीव प्रमाणेच बिले फॉरवर्ड करण्यासाठी आपल्या कार्यालयातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली.
आजवर च्या टप्पा वाढी वेळी प्रत्येक वेतन अधिक्षकांनी काटेकोर पणे अमलबजावणी केली आहे.सध्याच्या वेतन अधीक्षिका किशोरी करमुसे या देखील सतत अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना सहकार्य करत असल्याने ,संघटनेकडून समाधान व्यक्त करण्यात आले.तसेच अधीक्षक कार्यालयातील सौ माधुरी कुवर,श्री विनायक निळेकर,श्री राशीद मोमीन, यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान संघटनेचे जिल्हाध्य प्रा राहुल यादव,प्रा प्रशांत मेश्राम,प्रा अभिजित सुर्वे,प्रा अमोल धुळप,प्रा ओंकार प्रसादे,प्रा सुमेध मोहिते,प्रा सुशांत सुर्वे,समीर नारकर,अभिजित सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
वेतन अधीक्षिका किशोरी करमुसे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यावर अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत.यामुळेच अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना मोठ्या अपेक्षा आहेत्.
५११ हेड ला वाढीव २०% अनुदान निधी तात्काळ वर्ग व्हावा यासाठी कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,पुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर,मा.आमदार श्रीकांत देशपांडे जोरदार प्रयत्न करत आहेत .












