रत्नागिरी :
पाली ग्रामपंचायतीच्या पाली बाजारपेठ व देवतळे या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची मुख्य पाईपलाईन फुटलेली असल्याने या भागात फक्त गेल्या पंधरा दिवसातून एकदाच पाणी पुरवठा झाला आहे. तो ही आता पुन्हा बंद झाला आहे.
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईमध्ये केवळ या योजनेच्या ठेकेदाराने पाईपलाईनचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ती वारंवार फुटते आहे. त्यामुळे लाखो रूपयांची योजना व पुरेसा पाणीसाठा असूनही केवळ ठेकेदाराच्या बेजबाबदार पणामुळे पाली बाजारपेठ व देवतळे या भागात पंधरा दिवसात फक्त ऐकदा पाणी येऊन आता पुन्हा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या बेजबाबदार कंत्राटदारावर ग्रामपंचायतीच्याकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्याकडून होत आहे.
Home महत्वाच्या बातम्या पाली बाजारपेठ, देवतळे भागात पंधरा दिवस पाणीच नाही; पाईपलाईन फुटल्याने पुरवठा बंद













