अमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त आर. के. फाउंडेशन व कामगार मोर्चा, सिंधुदुर्ग यांचा उपक्रम
शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम यांचा १४ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून आर. के. फाउंडेशन व कामगार मोर्चा, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोफत नावनोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन शिरगांव येथे करण्यात आले आहे.
हे शिबिर १४ ऑक्टोबर रोजी शिरगाव येथील मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे., तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर के फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
कामगार नावनोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, फोटो, ग्रामसेवकाचा दाखला आणि कॉन्ट्रॅक्टरचा दाखला यांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे १२ ऑक्टोबरपर्यंत आमच्या कार्यालयात जमा करावयाची आहेत. हे शिबीर १४ ऑक्टोबर रोजी सकाळी शिरगाव येथील हनुमान मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क पंकज दुखंडे – ९१४६१०२३९८, सुहास राणे – ९३५६७१३७३७, ओमकार तावडे – ९३०७०७२४०५ विजय साटम – ९७६४५९३६२१ यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.










