रत्नागिरी : प्रतिनिधी
शहराजवळील राजिवडा येथे मासेमारी जेटीच्या बाजूला समुद्राच्या पाण्यात उभी करुन ठेवल्या बोटीवरील ९० हजाराचे इंजीन चोरट्याने पळविले. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ते ५ ऑक्टोबर सकाळी 7.30 सुमारास राजिवडा मासेमारी जेटी येथील समुद्राच्या पाण्यात घडली.
शोएब रियाज फणसोपकर ( ३३, रा. राजिवडा नाका, रत्नागिरी) यांच्या पत्नीच्या नावे असलेली मासेमारी बोट- सना जोया (रजिस्टर क्र. एनडी-एमएच-४ एमएम ६२९४) ही शनिवार 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 ते रविवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 यावेळात समुद्राच्या पाण्यात उभी करुन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने बोटीवरील यामाहा कंपनीचे ९.९ हॉर्स पॉवरचे इंजिन क्र. ६ बी ३ के. एल १०३८०६४ हे ९० हजाराचे इंजिन पळविले. या प्रकरणी शोएब रियाज फणसोपकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.












