रत्नागिरी – सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे दसरा सणानिमित्त *आय.बी.टी विभागाच्या* वतीने पारंपरिक *हत्यार पूजन* कार्यक्रम उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी मॅडम होत्या, तर मार्गदर्शन शिक्षक म्हणून श्री. मोहिते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आय.बी.टी कार्यशाळेमध्ये पार पडलेल्या या पूजनामध्ये विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध औजारांची पूजा करून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. पूजनाची संपूर्ण तयारी आय.बी.टी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केली होती.
कार्यक्रमात सर्व आय.बी.टी विद्यार्थी उपस्थित होते. पूजनानंतर मार्गदर्शनपर भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती तारी मॅडम यांनी दसरा सणाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोन उलगडून सांगितला. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कार्यप्रणालीमध्ये शिस्त, निष्ठा आणि कौशल्य या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आणि नियोजन विशेष कौतुकास्पद होते. हत्यार पूजनासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कामाविषयी अभिमान आणि आदराची भावना निर्माण होते, असे मार्गदर्शक शिक्षक मोहिते सर यांनी सांगितले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.











