सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर
वैभववाडी l प्रतिनिधी :
वैभववाडी पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
वैभववाडी पंचायत समितीची सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा एक महीन्यापुर्वी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. या इमारतीमध्ये सभापती व उपसभापती यांच्यासाठी सुसज्ज व प्रशस्त दालने बनविण्यात आली आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने सद्या बंद असलेली ही दालने लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. या दालनात बसणारा पहीला मानकरी कोण? हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.












