खेड – (प्रतिनिधी)
शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी खेड तालुक्यातील शिवसैनिक, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी विशेषतः शिवसेना नेते रामदास भाई कदम, राज्यमंत्री योगेश कदम, माजी सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम आणि माजी आमदार संजय राव कदम यांच्यासह आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आजपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पार पाडता आल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार देखील व्यक्त केले. या वाढदिवस सोहळ्याला माजी सभापती चंद्रकांत कदम, माजी आमदार संजय कदम, उद्योजक विलासभाई बुटाला, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते तसेच खेड तालुका शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुकवली शिवसेना शाखेच्या वतीने हा वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्त शक्तीतुरा सामन्यांचे आयोजनही करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते, आणि उपस्थितांनी सचिन धाडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या.













