दोडामार्ग प्रतिनिधी
दोडामार्ग पोलिसांनी विजघर चेक पोस्ट परिसरात केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेला एक बोलेरो पिकअप टेम्पो जप्त केला आहे. या गुन्ह्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत ₹८,०८,१६० आहे.
महाराष्ट्र व कोल्हापूर हद्दीवर विजघर चेक पोस्ट, येथे ही कारवाई करण्यात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजघर चेक पोस्ट येथे तपासणी सुरू असताना, आरोपींच्या ताब्यातील MH-०९ GJ ५६०४ या क्रमांकाचा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो (किंमत ₹८,००,०००) थांबवण्यात आला. या पिकअप टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटीची दारू गैरकायदेशीरपणे व बिगर परवाना वाहतूक करताना आढळून आली.
यामध्ये वाहतूक करताना दारूचा साठा आढळून आला यात
DSP Black DELUXE WHISKY (१८० मिली) च्या ४८ बाटल्या: किंमत ₹७,२००/-
ADRIEL CLASSIC WHISKY (७५० मिली) च्या ०४ बाटल्या: किंमत ₹९६०/-दारू आणि वाहनाची एकूण किंमत: ₹८,०८,१६०/-
या प्रकरणी पोलिसांनी
बिरू लखू लांबोर (वय २५), रा. कळसगादे पोस्ट तिल्लारीनगर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
बाबू धाकलू लांबोर (वय ३५), रा. कळसगादे पोस्ट तिल्लारीनगर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
दोन्ही आरोपी दारूचा अवैध साठा घेऊन वाहतूक करत असताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.












