बांदा : प्रतिनिधी
निगुडे गावठणवाडी येथील रवींद्र शशिकांत गावडे यांच्या घरावर आज संध्याकाळी वीज कोसळून विद्युत मीटर सह घरातील सर्व विद्युत बोर्ड जळून खाक झाले. घर बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. विजेचा धक्का एवढा तीव्र होता की घरातील भिंतीलाही तडे गेले आहेत. सदर घटना संदेश गावडे यांनी रवींद्र गावडे यांना कळवल्यानंतर ते घरी आले असता संपूर्ण विद्युत यंत्रणा खाक झाल्याचे निदर्शनास आले.
सदर घटनास्थळी निगुडे वायरमन गुरुनाथ कुडव, निगुडे माजी सरपंच समीर गावडे व माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी धाव घेत पाहणी केली. तसेच विद्युत कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांच्याशी चर्चा करण्यात आली
तसेच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे यासंदर्भात महसूल यंत्रणा व कृषी विभाग यांनी पंचनामे करावे, अशी मागणी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली आहे.














