गौरव पोंक्षे माखजन
पारतंत्र्याच्या काळात,अतिशय प्रतिकूल परिस्थित माखजन सारख्या ग्रामीण भागात,ज्या आद्य संस्थापकांनी त्याग करून या शिक्षण संस्थेची निर्मिती केली.त्यांच्या असीम कार्याची जाणीव प्रत्येकाने ठेवायलाच हवी असे मत अॅड बाळकृष्ण ओक यांनी व्यक्त केले.ते माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित संस्थापक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
हा कार्यक्रम प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर होते तर व्यासपीठावर सचिव दीपक पोंक्षे,सहसचिव दीपक शिगवण,शाळा समिती अध्यक्ष मनोज शिंदे,संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे,राजेश फणसे,हनीफ म्हाते,श्रीकांत फाटक, माखजन इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक महादेव परब,इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद च्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले आदी उपस्थित होते.
अॅड बाळकृष्ण ओक पुढे म्हणाले की,प्रत्येकाने नुसते शिक्षित न होता सुशिक्षित होता आले पाहिजे.शिक्षण हे स्वावलंबी होण्यासाठी मदत करत.त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार शिक्षण घ्या असा सल्ला दिला.ही शाळा होती म्हणून आपण गावातल्या गावात शिकू शकलो ह्याच भान प्रत्येकाला असायला हवं अस नमूद केले.
संस्थेचे प्राणवायू कै.गो.बा.नातू यांच्या स्मृतिदिनी प्रशालेत संस्थापक दिन साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने संस्था ,शाळा यांचेकडून कै.गो बा.नातू व आद्य संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.यावेळी दिपप्रज्वलन,सरस्वतीपूजन, ईशस्तवन,स्वागतगीत झाले.
संस्थापक दिनानिमित्त ढाल स्पर्धा घेण्यात येते.मराठी,इंग्रजी,हिंदी या तिन्ही भाषेत उत्तम भाषण करणाऱ्या विद्यार्थ्याला मानाची ढाल बक्षीस देण्यात येते.यावर्षी ही ढाल कल्याणी सचिन साठे हिने पटकवाली.कु कल्याणी साठे हिने आपले भाषण ओघवत्या भाषेत सादर करत उपस्थितांची माने जिंकली.
यावेळी ट्रस्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध बक्षीसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.प्रशालेतील ज्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धा मध्ये विभागस्तरासाठी निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.क्रीडा शिक्षक प्रा अभिजित सुर्वे,क्रांती म्हसकर यांना देखील सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमावेळी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले,संचालक श्रीकांत फाटक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तर शशिकांत घाणेकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमावेळी संस्थेची वाटचाल सचिन कदम यांनी विषद केली.तर ट्रस्ट च्या बक्षीस वितरणाचे वाचन जगदीश जाधव यांनी केले. प्रस्ताविक मुख्याध्यापक महादेव परब यांनी तर सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांत केले.तर आभार सचिव दीपक पोंक्षे यांनी मानले.









