सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फॅशन आणि इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
मसुरे | झुंजार पेडणेकर :फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग, कणकवली यांच्या वतीने “व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, मुलाखत शिष्टाचार व व्यावसायिक आचारसंहिता” या विषयावर दोन दिवसीय भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा
१५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायं. ४ वाजेपर्यंत,
१६ ऑक्टोंबर २०२५
दुपारी 11ते १ या वेळेत होणार आहे.
या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ सौ. निधी गौर पंकज इंदोर (१८ वर्षांचा अनुभव) आणि कु. स्नेहा सिंह मुंबई (१२ वर्षांचा अनुभव) प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी संवादात्मक व्याख्याने व प्रत्यक्ष कृती सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.
कॉलेजच्या संचालिका सार्था किशोर कदम म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणावर फॅशन आणि इंटिरियर डिझाईन विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ही संधी सोडू नये. आजचा दिवस तुमच्या भविष्यास दिशा देणारा ठरू शकतो.”
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षण नव्हे, तर यशस्वी करिअरकडे नेणारा पहिला टप्पा ठरणार आहे.
जिल्ह्यातील सर्व युवक आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.













