भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला च्या अध्यक्षपदी डॉ.आनंद बांदेकर यांची निवड

वेंगुर्ले : प्रतिनिधी
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची सभा मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पुढील तीन वर्षासाठी तालुका कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी डॉ.आनंद बांदेकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष ॲड. श्याम गोडकर, उपाध्यक्ष गजानन गोलतकर, सरचिटणीस पदी डॉ जी. पी. धुरी, सहचिटणीस पदी सौ. श्रेया मयेकर व खजिनदार पदी श्री सुरेश बोवलेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री रमण शंकरराव वायंगणकर, श्री विकास हरिश्चंद्र वैद्य, श्री दीपक मनोहर कोचरेकर, भरत बाबुराव आवळे, श्री रमेश पुंडलिक नार्वेकर,श्री सदानंद वासुदेव केरकर, सौ श्रेया विलास मांजरेकर, जयराम शंकरराव वायंगणकर राजेंद्र मनोहर कांबळी. स्वीकृत सदस्य म्हणून प्रा डॉ सचिन वासुदेव परुळकर व आत्माराम सोकटे तसेच सल्लागार पदी श्री गुरुनाथ कांबळी, श्री भाऊ आंदुर्लेकर, यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी मंडळाचे मावळते अध्यक्ष ॲड. श्याम गोडकर यांनी गेल्या तीन वर्षात मंडळाने राबविलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला व समाजाप्रती असलेल्या आदरभावाने काही अंशी समाजाचे ऋण फेडता आल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्व संचालकांच्या सहकार्या बद्दल आभार मानले. यावेळी पाटकर हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री आत्माराम सोकटे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नूतन अध्यक्ष डॉ आनंद बांदेकर म्हणाले की आपण सर्वानी एकमताने माझी अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल आभार मानले व सर्व कार्यकारिणी यांच्या सहकार्याने मंडळाचे कार्य अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करून भंडारी समाज संघटित करण्यासाठी गावोगावी बैठकांचे नियोजन करण्यात येईल व त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मंडळाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी नूतन अध्यक्ष आनंद बांदेकर यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच कार्यकारिणी सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी रमण वायंगणकर, सुरेश बोवलेकर यांची समयोचित भाषणे झाली शेवटी नूतन तालुका सरचिटणीस डॉ जी.पी. धुरी यांनी आभार मानले.