राजापुरातील सहा जि. प. गटांपैकी तीन गट सर्वसाधारण महिला तर दोन सर्वसाधारण व एक नामाप्र राखीव

राजापूर प्रतिनिधी: तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांसाठी रत्नागिरीत जाहिर झालेल्या आरक्षण सोडतीत विविध राजकिय पक्षांतील अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. तर काहींना मनासारखे आरक्षण पडल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषदेच्या राजापुर तालुक्यातील एकूण सहा गणांपैकी तीन गट महिला आरक्षित झाले आहेत. यामध्ये तळवडे व साखरीनाटे व कातळी हे सर्वसाधारण महिला आरक्षित झाले आहेत. तर जुवाठी हा गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून वडदहसोळ व धोपेश्वर हे दोन गट सर्वसाधारण झाले आहेत.
यामध्ये तळवडे व साखरीनाटे व कातळी हे सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने या गटातुन इच्छुक असलेल्या पुरूष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. मात्र या ठिकाणी महिला उमेदवारांना संधी मिळणार असल्याने महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे.
तर सर्वसाधारण झालेल्या वडदहसोळ व धोपेश्वर गटात सर्वच राजकिय पक्षांमध्ये कमालीची चुरस रहाणार असून या दोन्ही गटात अनेक इच्छुक उमेदवार असल्याने राजकिय पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. जुवाठी गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणीही काहींना दिलासा तर काहींना धक्का बसला आहे.
५१) वडद हसोळ – सर्वसाधारण
५२) तळवडे – सर्वसाधारण, महिला
५३) जुवाटी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
५४) धोपेश्वर – सर्वसाधारण
५५) साखरीनाटे- सर्वसाधारण, महिला
५६) कातळी – सर्वसाधारण महिला
————————————————————-