शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धडक
मालवण पोलीस निरीक्षकां समोर वाचला तक्रारींचा पाढा
पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाचा दिला इशारा
मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यां बाबत काही तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे यांनाही या पोलीस कर्मचाऱ्यांचा कारभाराचा अनुभव आला. याबाबत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना समजताच त्यांनी पदाधिकाऱ्यांसह मालवण पोलीस ठाण्यात धडक दिली. त्या तीन पोलीस कर्मचारी यांची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मोर्चा काढला जाईल. असा इशारा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना दिला.
याबाबत माहिती देताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, शिवसेना मालवण तालुका प्रमुख राजा गावडे यांच्या चौके येथील फार्म हाऊस ठिकाणी मालवण पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी यांनी बेकायदेशीरपणे कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. परंतु त्याठिकाणी असलेल्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. त्यानंतर पोलीस पाठच्या पाठी फिरले. पोलीस प्रशासनास याबाबत विचारणा केली असता योग्य ते उत्तर मिळाले नाही. नक्की ते का आले होते याची पुर्णपणे खात्री पटलेली नाही. याबाबत शिवसेना बैठकीत याबाबत चर्चा झाली असता त्या तीन पोलीस कर्मचारी घागरे, पेडणेकर, पवार यांच्या बाबत काही अन्य तक्रारी पुढे आल्या. त्याचप्रमाणे मालवण शहरात देखील काही पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात तक्रारी असल्याची माहिती समोर आली. मालवणच्या जनतेला जो त्रास होतीय जी लुटमार होतेय तसेच बकायदेशीर धंद्यांसाठी देखील यांचे समर्थन असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्वांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई झाली पाहिजे अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर पाच हजार जनसमुदाय घेऊन मोर्चा काढला जाईल. असा संतप्त इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण पोलीस निरीक्षक यांना दिला आहे.

काही ठिकाणी अवैध दारू व अन्य धंदे सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. याचीही चौकशी व्हावी. तरुणांई उध्वस्त करणारे, घरे उध्वस्त करणारे अवैध धंदे कोण करतं असतील आणि त्याला कोणाचा पाठिंबा मिळतं असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारवाई झालीच पाहिजे. अशी भुमिका घेण्यात आली. तसेच या सर्व प्रकरणात मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे, कॉल डिटेल तपासण्यात यावेत याबाबत मागणीही केली जाणार आहे. लवकरच या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईक विनायक राणे, उपतालूका प्रमुख विजय चव्हाण, अभी गावडे, अनंत धडाम, देवेंद्र नाईक, देवेंद्र नाईक, छोटू ठाकूर, पिंट्या गांवकर, शिवाजी परब, मनोज हडकर, मंदार लुडबे, भाऊ चव्हाण, प्रशांत परब यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.











