लांजा बाजारपेठेत सापडलेले पाकीट आणि रोख रक्कम केली मालकाला परत 

चाफेट येथील कान्होजी नेमण यांचा प्रामाणिकपणा 

लांजा (प्रतिनिधी) लांजा बाजारपेठ येथे सापडलेले पाकीट आणि रोख रक्कम मूळ मालकाला परत करून चाफेट नेमणवाडी येथील कान्होजी जाणू नेमण यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले .

याबाबत अधिक माहिती अशी की, लांजा तालुक्यातील गवाणे रेवाळेवाडी येथील रुपेश बापू रेवाळे हा तरुण आज १३ ऑक्टोबर रोजी आपल्या मोटर सायकलने लांजा येथे आला होता. मात्र गडबडीत दुपारी १२.३० वाजता त्याचे लांजा बाजारपेठेत पाकीट पडले होते. हे पाकीट लांजा तालुक्यातील चाफेट नेमणवाडी येथील कान्होजी नेमण यांना सापडले होते. या पाकिटात रोख रक्कम ३००० त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स ,आधार कार्ड, पॅन कार्ड होते.

बाजारपेठेत सापडलेले हे पाकीट कान्होजी नेमन यांनी प्रामाणिकपणे लांजा पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी दुपारी २ गेले असता याच दरम्यान पाकीट हरवलेला रुपेश रेवाळे हा लांजा पोलीस ठाण्यात पाकीट हरवले असल्याची फिर्याद दाखल

करण्यासाठी गेला होता. पाकिटाची ओळख पटवून कान्होजी नेमण यांन मालक रुपेश शेवाळे यांच्या ताब्यात दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप साळुंके, चालक बाबाजी बजागे

अशाप्रकारे लांजा बाजारपेठेत सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कान्होजी नेमण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.