चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक, तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि वैश्य समाजाचे मार्गदर्शक कै. संजयशेठ रेडीज यांच्या निधनाने चिपळूण व तालुक्याच्या सामाजिक, सहकारी आणि व्यापारी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली वाहण्यासाठी चिपळूण अर्बन बँक परिवार आणि वैश्य समाज, चिपळूण यांच्या वतीने मंळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. वैश्यभवन ‘राधाताई लाड’ सभागृह, खेंड, चिपळूण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या श्रद्धांजली सभेला बँकिंग, सहकारी, व्यापारी व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कै. संजयशेठ रेडीज यांनी चिपळूण अर्बन बँक तसेच वैश्य समाजाच्या प्रगतीसाठी दिलेले मोलाचे योगदान नेहमीच स्मरणात राहील













