मसुरे | झुंजार पेडणेकर
कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ, रामटेक येथे आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धा निवड फेरी २०२५-२६ मधून न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूरची माजी विद्यार्थिनी कुमारी निकिता लाड हिची चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ खेळ स्पर्धेसाठी निवड झाली. निकिताचे ५ ते १० वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर येथे झाले. शाळेच्या क्रीडा शिक्षिका सौ. अर्चना देसाई आणि सहकारी शिक्षकांनी निकिताला शालेय जीवनात मार्गदर्शन केले.
निकिता योगामधून पदवीचे शिक्षण घेत आहे. तिचे हे यश तिच्यासाठीच मर्यादित नसून सर्व विद्यार्थ्यांना आदर्शवत आहे. निकिताने शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे तिचे अभिनंदन केले आहे.












