स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेमार्फत सामाजिक उपक्रमांतर्गत जाकादेवी येथे डासनिर्मुलन फवारणी मोहिम : जाकादेवी ग्रामपंचायतीचे सहाय्य

स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेववृध्दी मास सध्या सुरु असून ग्राहकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद सदर मासाला लाभला आहे. या मासानिमित्ताने सर्वत्र संपर्क मोहिम संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. समाजामधुन ठेव गोळा करीत असतानाच या समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबविण्याचे धोरणही संस्थेने ठेवले आहे. या अंतर्गत संस्थेने जाकादेवी व पावस या ठिकाणी डास निर्मुलन फवारणी मोहिम राबण्यिाचे ठरविले व याची सुरुवात आज जाकादेवी येथे जाकादेवी खालगाव ग्रामपंचातीचे सहाय्याने पावसाळयाचे पार्श्वभूमीवर जाकादेवी ग्रामपंचायतीचे हद्दीमध्ये करण्यात आली. जाकादेवी येथे संस्थेची शाखा गेली १९ वर्षे कार्यरत असून जाकादेवी ग्रामस्थांनी सदर शाखेला भरीव सहकार्य आजर्पंत केले आहे. या पार्श्वभूमीवर जाकादेवी ग्रामस्थांचे आरोग्याचे दृष्टीने उपयुक्त अशी डास निर्मुलन फवारणी आज करण्यात आली.
या वेळी जाकादेवी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.प्रकाश खोल्ये, उपसरपंच श्री.कैलास खेडेकर, संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन, जाकादेवी शाखेचे शाखाधिकारी श्री.सुमीत घाणेकर, पिग्मी प्रतिनिधी श्री.प्रशांत सावंत व जाकादेवी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.