राजापूर (प्रतिनिधी): शहरात बंदरधक्का परिसरात गुरूवारी भरलेल्या आठवडा बाजारात या ठिकाणी असलेला गुलमोहराचा वृक्ष अचानक उन्मळून कोसळल्याने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकाचा दुदैवी मृत्यु झाला आहे. तर यामध्ये आठवडा बाजारात विक्रीसाठी बसलेल्या तीन मच्छीमार महिला विक्रेत्या गंभीर जखमी झाल्या आहेत. गुरूवारी सायंकाळी 4.30 ते 4.45 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत रामचंद्र शेळके रा. बारसू हे जागेवरच ठार झाले असून मुमताज आसिफ फनसोपकर वय 48, यास्मिन शौकत कोत्वडकर वय 35 व सायका इरफान पावसकर वय 55 रा. मधीलवाडा कावन या जखमी झाल्या आहेत. त्यांना राजापूर ग्रामीणरूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.