न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याचा ११ ऑगस्टला कोल्हापुरात होणार गौरव
सावंतवाडी : ‘न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज’, सावंतवाडी येथील विद्यार्थी गोविंद बाबुराव गावडे याला त्याच्या ‘शिवतांडव स्तोत्रावर आधारित विश्वविक्रमी तबला वादनासाठी’ ग्लोबल रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक बुक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ११ ऑगस्ट २०२५ रोजी, ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या’ विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
गोविंद गावडेने ‘शिवतांडव स्तोत्रावर’ आधारित सलग तबला वादन करून एक मोठा विश्वविक्रम केला आहे. या खास कामगिरीबद्दल त्याला हा सन्मान दिला जात आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता दीपप्रज्वलनाने होईल, तर सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक आणि ग्लोबल व आशिया पॅसिफिक बुक निरीक्षक प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा शिक्षणमहर्षी प.पू डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, श्री स्वामी विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे संपन्न होईल.
या कार्यक्रमासाठी गोविंद गावडेचे वडील बाबुराव गावडे, तसेच बाळकृष्ण गावडे, चंद्रकात गावडे, चंद्रकात महादेव गावडे, प्रकाश गावडे, सविता गावडे, सुरेखा गावडे, तुकाराम गावडे, बाळकृष्ण गावडे, प्रकाश गवस (गेळे), प्रकाश राऊळ, तसेच मेनन अँड मेनन कंपनीचे समस्त कामगार, कर्मचारी, स्टाफ आणि गावडे परिवाराने सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे.
हा सोहळा गोविंदच्या या भव्य यशाचा गौरव करणारा असल्याने सर्व संगीतप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.












