परुळे l प्रतिनिधी :परुळे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी स्व:कमाईचे धडे गिरवत स्वतः बनविलेले आकाशकंदील शुक्रवार च्या आठवडे बाजारात विकून स्व कमाईचा आनंद घेतला.
सगळीकडे दिवाळीचा आनंद वातावरणात आहे. दिवाळी ची तयारी सुरू आहे. शाळेची सहामाही परीक्षा संपली आहे. यावेळी कार्यानुभव अंतर्गत मुलांना आकाश कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आणि मुलानी आकर्षक असे कंदील बनविले आणि ते विक्रीसाठी उपलब्ध केले. स्वता मुलानी आकाशकंदील विक्रीचा आनंद लुटला. बाजारसाठी आलेल्या ग्रामस्थांनी मुलांच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि कंदील विकत घेतले.












