श्रीमती अनिता दळवी यांचे निधन!

मसुरे | प्रतिनिधी : श्रावण येथील श्रीमती अनिता एकनाथ दळवी (78 वर्ष ) यांचे अल्प आजाराने लालबाग मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, दीर, भाऊ, भावजयी, पुतण्या, भाचे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मनमिळावू स्वभावाच्या अनिता दळवी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन दळवी यांच्या आई तर देवगड तालुक्यातील मुणगे येथील आंबा बागायतदार नाना बागवे, मुंबई येथील दिलीप बागवे यांच्या जेष्ठ भगिनीं तर श्री भगवती हायस्कुल मुणगेचे सहा.शिक्षक प्रसाद बागवे यांच्या आत्या होत.