अंबप फाटा येथे चार चाकीला भीषण आग सुदैवानं जीवितहानी नाही.

पत्रकार प्रकाश कांबळे यांचे मोलाचे सहकार्य

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापुर : अंबप फाटा येथे पुणे बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर रात्री ११ च्या दरम्यान कोल्हापूरहुन वाळव्याला जाणाऱ्या चारचाकी गाडीच्या इंजिनला अचानक आग लागली यामध्ये सत्यजित संजय पाटील (रा.लाडेगाव,ता.वाळवा जि. सांगली)हे आपले साडू व मेहुणी सह कोल्हापूरला दिपावलीच्या खरेदीसाठी गेले होते आग मुख्य रस्त्यावर लागल्यामुळे वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या तर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहुन सत्यजित पाटील आपली चारचाकी गाडी क्र.एम.एच २० बी.एम ८५७१ मधून घरी जात असताना अंबप फाटा येथे आल्यानंतर अचानक गाडीतुन धूर येऊ लागला गाडी जाग्यावरच थांबऊन तिघे ही तात्काळ गाडीतून उतरले आणि बाजूला थांबले.आपली समोर पेटतेली गाडी बघून मालक अस्वस्थ झाला बघेपर्यंत अगीने रुद्र रूप धारण केले डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं ऐन दीपावलीच्या तोंडावर आपली गाडी पेटतेली बघून मालकास अश्रू अनावर झाले. यावेळी वडगांव अग्निशामन दलाचे कर्तव्यदक्ष ड्रायव्हर गणेश नायकवडी , फायरमॅन वैभव शिंदे, रोहन पोवार, अंकुश कदम यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. तर पत्रकार प्रकाश कांबळे, ओंकार कुंभार, किशोर जासूद, स्वीकार कांबळे यांनी मदत केली. सुदैवाने कोणती ही जीवितहानी झालेली नाही.

दै.बंधुता’चे पत्रकार प्रकाश कांबळे यांची तत्पर मदत
रात्री पेठवडगांवहुन घरी जात असताना डोळ्यासमोर पेटतेली चार चाकी बघितती मालकाच्या जवळ जाऊन विचारपूस केली गाडीमध्ये मोबाईल आणि दीपावलीसाठी खरेदी केलेलं सामान होतं ते त्यांना काढायला लावलं. तात्काळ ११२ ला कॉल करून घडलेल्या घटनेची माहिती दिली लगेच वडगांव नगरपरिषदेची अग्निशामक गाडी आली त्यांनी आग विझवली लगेच क्रेनला फोन करून रस्त्यावर असलेली गाडी बाजूला काढली वेळे वर मदत मिळाल्यामुळे गाडीमालकाने पत्रकार प्रकाश कांबळे यांचे आभार मानले.