मँगो इव्हेंटस् प्रस्तुत ‘समर्पण’ अभंग, भावगीत कार्यक्रमाचे आयोजन
चिपळूण (वार्ताहर) : श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान गोवळकोट -पेठमाप चिपळूण येथे सोमवार दि. २० ऑक्टरोबर रोजी पहाटे ६ वाजता दिवाळी पहाट संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मँगो इव्हेंटस् प्रस्तुत ‘समर्पण’ हा अभंग, भावगीत, नाट्यगीतांची सुरेल मैफल रंगणार आहे.
गोवळकोट चिपळूण येथील श्री देवी करंजेश्वरी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभंग, भावगीत, नाट्य संगीतांची सुरेल मैफल रंगणार असून सुर नवा ध्यास नवा फेम ईशानी पाटणकर, गायक अभिजीत भट, संकलन व निवेदन अभिजीत गोडबोले, हार्मोनियम चैतन्य पटवर्धन, तबला केदार लिंगायत, पखवाज मंगेश चव्हाण, ध्वनी उदय जवळ रेणुका साऊंड सिस्टिम अशा मंत्रमुग्ध कार्यक्रमाची मेजवाणी रसिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नरकचतुर्दशी अभ्यंगस्नान दीपावलीचे औचित्य साधून ‘समर्पण संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवहन देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर यांनी केले आहे.











