दोडामार्गच्या रविवार बाजारात दिवाळी खरेदीसाठी मोठी गर्दी;

फुले आणि अन्य सामानाला मागणी
​दोडामार्ग:सुहास देसाई

​ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर आज, रविवार असल्यामुळे दोडामार्ग येथील आठवडी बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या अन्य दिवसांसाठी लागणारे साहित्य तसेच विशेषतः फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबळ उडाली होती.

​दिवाळीच्या तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे सामान घेण्यासाठी नागरिक आज सकाळपासूनच बाजारात गोवा राज्यातील सीमावर्ती गावे व तालुकातील गावातून मोठया प्रमाणात ग्राहक येत असतात .बचत गट माध्यमातून फराळ साहित्य तसेच पणती, आकाशकंदील, रांगोळीचे रंग, सजावटीचे साहित्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या स्टॉल्सवर विशेष गर्दी ग्राहकांनी गेली होती.

​यामध्येही, लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असणारी विविध प्रकारची फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. झेंडू, शेवंती, गुलाब आणि अन्य फुलांच्या दरात वाढ होऊनही,खरेदी करताना गर्दी दिसत होती. विक्रेत्यांनीही ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री करण्यासाठी ठिकठिकाणी तिलारी, गोवा रस्तावर दुकानें थाटली होती

​एकंदरीत, दिवाळीच्या उत्साहात आणि रविवारच्या सुट्टीमुळे दोडामार्गचा बाजार आज गर्दीने फुलून गेला होता. नागरिकांमध्ये सणाच्या खरेदीचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. यामुळे स्थानिक विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव दिसत होते