सावंतवाडीत ‘नरकासुर स्पर्धेत ‘चितार आळी बॉईज आणि युनिक बॉईज विजेते

 

‘आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळा’ चे दिमाखदार आयोजन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ’ आयोजित ‘नरकासुर स्पर्धा २०२५’ मोठ्या उत्साहात पार पडली. सावंतवाडी शहरातील शिवरामराजे भोसले पुतळा ते सारस्वत बँक मार्गावर शेकडोंच्या उपस्थितीत ही स्पर्धा रंगली. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. ही स्पर्धा खुला गट (मोठा गट) आणि बालगट (लहान गट) अशा दोन गटांत अत्यंत चुरशीने पार पडली.

खुला गटात चिताराळी बॉईज यांनी प्रथम क्रमांकाचे (बक्षीस: ₹ २५,०००) विजेतेपद पटकावले. माठेवाडा बालगोपाळ मित्रमंडळ द्वितीय (बक्षीस: ₹ १५,०००) आणि दळवीवाडा युवक कला क्रीडा मंडळ, माजगाव तृतीय (बक्षीस: ₹ १०,०००) क्रमांकावर राहिले.

बालगटात युनिक बॉईज, सालईवाडा यांनी प्रथम क्रमांक (बक्षीस: ₹ १०,०००) मिळवला. बाळगोपाळ माठेवाडा द्वितीय (बक्षीस: ₹ ७,०००) तर खासकिलवाडा बॉईज यांनी तृतीय (बक्षीस: ₹ ५,०००) क्रमांक पटकावला. याव्यतिरिक्त, माठेवाडा मित्रमंडळ आणि झकास मित्रमंडळ वैश्यवाडा यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य सुहास गवंडळकर, तालुका अध्यक्ष बाळू देसाई, विनोद राऊळ, अजय गोंदावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमुळे सावंतवाडी शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.