महायुतीचा धर्म म्हणून स्वराज्य संस्था निवडणुका लढविल्या जातील- आ. शेखर निकम
चिपळूण (वार्ताहर) : आता युती नको स्वबळावरच आपण लढू…आपण आपली अजमावू…आम्ही ताकदीने पक्षासाठी मैदानात उतरू, त्यामुळे स्वबळावरच लढण्याचा निर्णय घ्या…तर अनेकांनी युती म्हणूच आपण लढू अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या व कार्यकर्त्यांनी आजच्या बैठकीत केली तर आ. शेखर निकम यांनी या ठिकाणी युतीचा धर्म पाळला जाईल. सर्व निवडणूका युती म्हणूनच लढल्या जातील, असे स्पष्ट आदेश आजच्या बैठकीत दिले. राष्ट्रवादी कॉग्रेस अजितदादा पवार गटाची बैठक आज सावर्डे येथे आ. शेखर निकम याच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची मते आ. शेखर निकम यांनी जाणून घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपण आपल्या पक्षाची ताकद अजमावू, आपल्याला युती नको, आम्ही ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरू, असे स्पष्ट केले. तर अन्य कार्यकर्त्यांनी आपण युतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवूया असे स्पष्ट केले. युती झाली तर महायुतीला भरघोस यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आ. शेखर निकम यांनी सर्व कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्यानंतर स्पष्ट केले की, मुळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या आदेशानुसारच निवडणूक लढल्या जातील. आज आपण महायुती म्हणून एकत्र आहोत आणि एकत्रच रहायचे आहे. महायुतीम्हणूनच निवडणुका लढल्या जातील हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. सन्मानजणक जागा वाटप झाले पाहिजे हा मताचा मी आहे आणि तशा पद्धतीने जागावाटप होईल याची खात्री मला आहे. मात्र काही असले तरी तो निर्णय आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ त्याची काळजी तुम्ही करू नका. मात्र प्रत्येक कार्यकर्त्याने आपणच उमेदवार आहे या भावनेतून आतापासून कामाला लागा असे आदेश देताना जे निर्णय होतील ते संगीतले जातील. आज तिन्ही पक्ष मोठे आहेत. त्यामुळे युती आणि उमेदवार याचा निर्णय आम्ही आमच्या स्थरावर घेऊ असे स्पष्ट केले.
यावेळी आमदार शेखर निकम, जयंद्रथ खताते, शौकत मुकादम, दादा साळवी, नितीन ठसाळे, रमेश राणे, दिलीप माटे, संतोष सावर्डेकर,पूजा निकम, दिशा दाभोळकर, जाकीर शेख, अनिलकुमार जोशी, रिया कांबळे, विजय गुजर, सूर्यकांत खेतले, समीक्षा बागवे, निलेश कदम, सचिन साडविलकर, डॉ. राकेश चाळके, समीर काझी, मिलिंद कापडी, पांडूरंग माळी, जागृती शिंदे, सूर्यकांत खेतले, शरद शिगवण, सुरेश खापले, निलेश कोलगे, बाबू साळवी, मयूर खेतले, नागेश साळवी, विकास गमरे, दिनेश साळवी, स्वप्नील शिंदे, सुरेश कुळे, विष्णू बैकर, दत्ता गुजर, निलेश खापरे, सुधीर राजेशिर्के तसेच राष्ट्रवादी पक्षाचे बहुसंख्य प्रमुख पदाधिकारी सदर बैठकीला उपस्थित होते.











