चिपळूण – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे द्वारा प्रकाशीत
२०२३ मधे पाचव्यांदा पुनर्प्रकाशित केलेल्या दहावीच्या पुस्तकात हिंदी लोकभारती पुस्तकात भारतीय सविधानाची उद्देशिक छापण्यात आली आहे . संविधानाच्या प्रस्ताविकेत जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत असा आरोप खेरशेत (ता. चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कदम यांनी केला आहे .
संविधानाच्या प्रस्ताविकेत (उद्देशिका)चुका करणाऱ्या लेखक व प्रकाशन समिती वर कायदेशीर करवाई करावी आणि त्यातील चुका विनाविलंब दुरुस्त करूनच पुस्तक विद्याथ्याना वितरित करावे अशी मागणी ही मिलिंद कदम यांनी केली आहे .
भारतीय सविधान कलम ५१ क पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर (आतील भागात ) संविधानाच्या भाग क मधील कर्तव्य छापण्यात आली आहेत . यात सुद्धा अनेक चुका आहेत .
विषेश म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वर्षा दरम्यानच्या अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी ही पालकांवर टाकण्यात आली आहे . खरे तर ही जबाबदारी शासनाची आहे . जी भारतीय संविधान लागू झाल्याच्या ६० वर्षा नंतर ही पूरेपूर स्वीकारली नाही , असे या प्रकारावरून संकेत मिळत असल्याचे मिलिंद कदम यांनी सांगितले .












