दापोली | प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी दापोली शहरातील कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीचे माजी. जिल्हाध्यक्ष केदार साठे,उपजिल्हाध्यक्ष श्रीराम इदाते, तालुकाध्यक्ष व नगरसेविका सौ. जया साळवी तसेच तालुका सरचिटणीस संदीप केळकर, विवेक भावे यांच्या उपस्थितीत दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहराध्यक्ष श्री. अतुल गोंदकर यांनी जाहीर केली.
यावेळी शहर उपाध्यक्ष पदी श्री. उदय पवार,श्री. किरण बामणे,श्री. मनोज शिर्के,श्री. मयुरेश वेल्हाळ यांची नियुक्ती करण्यात आली. शहर सरचिटणीस पदी श्री.अमोल तांबे,श्री. मयुर घाडगे नियुक्ती करण्यात आली.शहर चिटणीस पदी श्री. सचिन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. शहर महिला मोर्चा शहराध्यक्षपदी पदी सौ. वैष्णवी वेल्हाळ यांची नियुक्ती करण्यात आली तसेच युवा मोर्चा शहराध्यक्षपदी श्री.आदित्य रेळेकर आणि युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी श्री. भुषण भांबुरे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.










