लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र संतोष शांताराम पेडणेकर यांची महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघाच्या लांजा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे..
संतोष पेडणेकर हे गेली काही वर्षे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभागी आहेत. त्यांच्या या एकूणच कार्याची दखल घेत महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघाच्या लांजा तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र पालघर जिल्हा सरचिटणीस सुप्रीम सुर्वे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिले आहे.
संघटनेच्या माध्यमातून सभासद कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या नोंदणीकृत घटनेमधील नियमांचे तंतोतंत पालन करून व त्यासाठी आपला योग्य ते वेळ देऊन कामगार हिताचे कार्य करा, अशी अपेक्षा या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली असून या निवडीबद्दल संतोष पेडणेकर यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.












