दापोली प्रतिनिधी– दापोलीकरांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा यासाठी गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोली आगाराला 35 ईव्ही बसेस प्राप्त होणार असून यातील 10 बसेस पहिल्या टप्प्यात दापोली आगारात दाखल झाल्या असुन त्याचा लोकार्पण सोहळा मा.ना.राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत उद्या दिनांक 27/10/2025 रोजी दु. 12.00 वाजता संप्नन्न होणार आहे
एसटीचा तोटा कमी व्हावा आणि पर्यावरण रक्षणासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या ताफ्यामध्ये 5 हजार ईव्ही बसेस आणण्याचे निश्चित केले आहे. राज्याच्या विविध भागात हा उपक्रम सुरू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 150 ईव्ही बसेस येणार असून राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोलीत सर्वप्रथम 10 बसेस आणण्यात आल्या आहेत.उद्या होणा-या या सोहळ्यासाठी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन श्री किशोर देसाई दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख यांनी केले आहे.











