उतारावरून मागे येणाऱ्या रिक्षेतून उड्या मारताना तीन महिला जखमी

रत्नागिरी ः प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील मुरडे येथील चढावात रिक्षा बंद पडून मागे येताना रिक्षेतील तिन महिलांना बाहेर उड्या माल्याने त्यांना दुखापत झाली. उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास घडली.
साक्षी नितीन गुरव (21),रुपाली कमलाकर गुरव (25 आणि दिक्षा बबन गुरव (सर्व रा.देवरुख सोळजाईवाडी,रत्नागिरी) अशी जखमी तीन महिलांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी रिक्षा चालक बबन गुरव (रा.देवरुख सोळजाईवाडी,रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-व्ही-2176) मधून साक्षी ,रुपाली आणि त्याची बहिण दिक्षा या तिघिंना बसवून मुरडे ते देवरुख असा येत होता. मुरडे येथील चढावात आला असता रिक्षा अचानकपणे बंद पडून मागे-मागे येउ लागली. त्यामुळे घाबरलेल्या तिन्ही महिलांनी रिक्षेतून बाहेर उड्या मारल्या. यात त्यांना दुखापत झाल्यामुळे प्रथम देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात रिक्षा मागे येउन रस्त्याच्या खाली जाउल पलटी झाल्यामुळे तिचेही नुकसान झाले आहे.